तडीपार आदेशाचा उल्लंघनप्रकरणी साताऱ्यात एकास अटक

by Team Satara Today | published on : 28 November 2025


सातारा : तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहरुख नौशाद खान (वय ३१, रा. सोमवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षकांनी आरोपीला संपूर्ण सातारा जिल्ह्यातून २० मे २०२५ पासून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते.

मात्र दि. २७ रोजी तो शाहू चौक, नगरपरिषद परिसरात आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत आदेश उल्लंघनाचा गुन्हा नोंदवला. फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सचिन माधव रिटे यांनी दिली असून तपास पोलीस हवालदार यादव करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात वडापाव चालकाला मागितली दहा हजाराची खंडणी; खंडणी, शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा दाखल, अजंठा चौक येथील घटना
पुढील बातमी
नागेवाडीतून मुलगा-मुलीचे अपहरण ; अल्पवयीन मुलीसोबत पलायन, गुन्हा सातारा तालुका पोलिसांकडे वर्ग

संबंधित बातम्या