65 गटांचा आणि गणांचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध

21 जुलै पर्यंत हरकती नोंदवण्याचे आवाहन; इच्छुकांच्या नजरा गटाकडे, गणाकडे

by Team Satara Today | published on : 14 July 2025


सातारा : सातारा जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समितीतील गणांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज 65 गटांचा आणि 110 गणांचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यावरुन हरकती घेण्याची मुदत दि. 21 जुलैपर्यंत देण्यात आली आहे. आपल्या हरकती दि. 21 जुलैपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रारुप आराखडा प्रसिद्ध करण्यात आल्याने अनेकांच्या राजकीय इच्छा जागृत झाल्या आहेत. गट, गण आपल्यासाठी आहे का, याची चाचपणी सुरु झाली आहे.

शासन आदेशानुसार सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गटांचा आराखडा जाहीर केला आहे. त्याबाबत निवडणूक शाखेचे तोहिद मुल्ला यांना विचारणा केली असता ते म्हणाले, वेबसाईटवर जावा सगळी माहिती आहे. तेथून माहिती घ्या, असे त्यांनी सांगितले. वेबसाईटच्या आधारे आलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकार्‍यांनी गटाच्या गावांची यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीवर ज्या लोकांच्या काही हरकती असतील त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी यांच्याकडे दि. 21 जुलै किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात, त्यानंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे आवाहन केले आहे. मात्र, आपले गाव कोणत्या गटात आहे, कोणत्या गणात आहे याची उत्सुकता लागलेल्या अनेकांनी माध्यमांच्या प्रतिनिधीना फोन करुन विचारणा केली, तर काहींनी निवडणूक कार्यालयात विचारणा केली. 

दरम्यान, जाहीर करण्यात आलेल्या आदेशातील गटाची माहिती पुढील प्रमाणे - तालुकानिहाय - खंडाळा तालुक्यात शिरवळ गटात पळशी, वडगाव, जवळे, लोहोम, झगलवाडी, लिंबाचीवाडी, घाडगेवाडी, कर्नवडी, अतिट, कान्हवडी, मिरजे, गुठाळवाडी, विंग, राजेवाडी, वडवाडी, हरतळी, भाटघर, शिरवळ, मोह तर्फ शिरवळ, देवघर पुर्न, शिंदेवाडी अशा गावांचा समावेश करण्यात आला आहे. 

भादे गटात मोर्वे, भादवडे, तोंडल, लोणी, भोळी, माने कॉलनी, शेखमिरवाडी, धनगरवाडी, पिसाळवाडी, सांगवी, नायगाव, सावळ पुर्न, केसुर्डी, कवठे, पाडेगाव, बावकलवाडी, पिंपरे बुद्रुक, बाळुपाटलाचीवाडी, मरिआईचीवाडी, अंदोरी, रुई, कराडवाडी, वाघोशी, शेडगेवाडी, दापकेघर पूर्न, वाठार बुद्रुक, भादे यांचा समावेश आहे. 

खेड बुद्रुकमध्ये खेड बुद्रुक, राजंणी पूर्न, गोळेगाव पूर्न, निंबोंडी, कोपर्डे, पाडळी, बोरी, येळेवाडी, घाटदरे, सुखेड, अहिरे, वहागाव पूर्न, हरळी, म्हावशी, शिवाजीनगर, बावडा, पारगाव, कण्हेरी, आसवली, अजनुज, अंबारवाडी, पवारवाडी, हरिपूर(वाण्याचीवाडी) या गावांचा समावेश आहे. 

फलटण तालुक्यात तरडगावमध्ये पाडेगाव, परहर खु पूनर्व, कुसुर, मिरेवाडी कु, रावडी खुदं, रावडी बुद्रुक, मुरुम, खामगाव, तडवळे, खराडेवाडी, कोंडार पूनर्व, कोरेगाव, कापडगाव, तरडगाव, वरवंड पूनर्व, माळेवाडी, शिंदेमाळ, विठ्ठलवाडी, डोंबाळवाडी, काळज, चव्हाणवाडी यांचा समावेश करण्यात आला आहे. 

साखरवाडी पिंपळवाडीमध्ये होळ, साखरवाडी पिंपळवाडी, जिंती, फडतरवाडी, भिलकटी, खुंटे, शिंदेवाडी, चौधरवाडी, कांबळेश्वर, सस्तेवाडी, अलगुडेवाडी यांचा समावेश आहे. विडणीमध्ये सोमंथळी, सांगवी, सोनगाव, राजाळे, टाकळवाडे, धुळदेव, विडणी, माजेरी पूनर्व, पिंपरद यांचा समावेश आहे.

गुणवरेमध्ये गुणवरे, सरडे, साठे, मठाचीवाडी, खटकेवस्ती, आसू, गोखळी, ढवळेवाडी, पवारवाडी, जाधववाडी, हणमंतवाडी, शिंदेनगर यांचा समावेश आहे. 

बरडमध्ये बरड, बागेवाडी, राजंणी पूनर्व, मुंजवडी, राजुरी, भवानीनगर, राजुरी, भवानीनगर, विवर पूनर्व, शेरेशिंदेवाडी, निंबळकर, वाजेगाव पूनर्व, रांजणी पूनर्व, नाईकबोमवाडी, दुधेबावी, विवर पूनर्व, तिरकवाडी, वडले, मिरढे, जावली, आंदरुड, कुरवली बुद्रुक, दत्तनगर यांचा समावेश आहे. 

कोळकीमध्ये गिरवी, गिरवी, धुमाळवाडी, सोनवडी बुद्रुक, भाडळी बुद्रुक, भाडळी खुर्द, बोडकेवाडी, झिरपवाडी, दालवडी, विंचुणी, कुरवली खु, जोर कुरवली खु, पूनर्व, तावडी, जाधववाडी फ, ठाकुरकी, गोळेगाव पूनर्व, सासकल, निरगुडी, मांडवखडक यांचा समावेश आहे. 

वाठार निंबाळकरमध्ये वाठार निंबाळकर, गोळेवाडी पूनर्व, वाखरी, जोर वाखरी, ढवळ, उपळवे, दर्‍याचीवाडी, सावंतवाडी, जाधवनगर, तरडफ, सपकळवाडी, वेळोशी, शेरेचीवाडी (ढ), खडकी, मिरेवाडी(दा), फरांदवाडी, उळुंब पूनर्व, वडजल, रायरीगुडे पुनर्व, काशिदवाडी, ढवळेवाडी निं, मिरगाव, धामुनशी पूनर्व, नांदल, हिरडोशी पूनर्व, मुळीकवाडी, घाडगेमळा, निंभोरे, घाडगेवाडी या गावांचा समावेश आहे. 

हिंगणगावमध्ये मलवाडी, सासवड, वडगाव, वाघोशी, पिराचीवाडी, ताथवडा, महु पूनर्व, कोर्‍हाळे, आळजापूर, बिबी, कापशी, टाकुबाईचीवाडी, झडकबाईचीवाडी, मानेवाडी, हिंगणगाव, परहर बु पूनर्व, आदर्की बु, आदर्की खु, शेरेचीवाडी हिं, सालपे, कोपर्डे, तांबवे, चांभारवाडी, आरडगाव यांचा समावेश आहे. 

माण तालुक्यात आंधळीमध्ये मलवडी वारुगड, उगल्याचीवाडी, खंड्याचीवाडी, गरडाचीवाडी, श्रीपालवण, शिंदी खु, भांडवली, कुळकजाई, खोकडे, माडेवाडी, कळसकरवाडी, परकंदी, बोथे, शिरवली, सत्रेवाडी, टाकेवाडी, आंधळी, महिमानगड, उर्किडे, पांढरवाडी, कोळेवाडी, सुरुपखानवाडी, दिवडी, शिंदी बु, बोडके, पिंगळी बु, पिंगळी खु, कासारवाडी यांचा समावेश आहे. 

बिदालमध्ये बिदाल, येळेवाडी, वडगाव, पांगारी, बिरोबानगर, मोगराळे, बिजवडी, पाचवड, अनभुलेवाडी, तोंडले, जाधववाडी, वावरहिरे, दानवलेवाडी, शिंगणापूर, थदाळे, डंगिरेवाडी, मोही, राजवडी, हस्तनपूर घेरेवाडी, खुटबाव या गावांचा समावेश आहे. 

मार्डीमध्ये मार्डी, राजंणी, इंजबाव, भालवडी, राणंद, शेवरी, सोकासन, संभूखेड, वरकुटे म्हसवड, माळवाडी, परयंती, खडकी, भाटकी, हवालदारवाडी, कारखेल, धुळदेव, हिंगणी, वाकी या गावांचा समावेश आहे. 

गोंदवले बुद्रुकमध्ये धामणी, अंबवडे बु, पू, जाशी, मणकर्णवाडी, पळशी, वेणेखोल पुनर्व, काटेवाडी पुनर्व, पिंपरी, दिडवाघवाडी, दिवड, वडगाव पू, रोहोट पू, ढाकणी, गोंदवले बु, वाघमोडेवाडी, गोंदवले खु, किरकसाल, लोधवडे, काळेवाडी, दोरगेवाडी, नरवणे यांचा समावेश आहे.

कुकुडवाडमध्ये कुकुडवाड, आगासवाडी, पुकळेवाडी, वडजल, विरळी, चिलारवाडी, वळई, काळचौंडी, गंगोती, पानवण, गटेवाडी, वरकुटे मलवडी, कुरणेवाडी, महाबळेश्वरवाडी, पुळकोटी, शिरताव, देवापुर, पळसावडे, शेनवडी, जांभुळणी, बनगरवाडी या गावांचा समावेश आहे. 

खटाव तालुक्यात बुधमध्ये मांजरवाडी, मोळ, चिंचणी, काळेवाडी, पांढरवाडी, अनपटवाडी, डिस्कळ, गारवडी, शिंदेवाडी, नवलेवाडी, ललगुण, नागनाथवाडी, पांगरखेल, राजापूर, बुध, काटेवाडी, फडतरवाडी बु, पवारवाडी, वर्धनगड, नेर, फडतरवाडी नेर, विसापूर, वेटणे, रणशिंगवाडी, कातागळेवाडी यांचा समावेश आहे. 

पुसेगावमध्ये पुसेगाव, उंबरमळे, निढळ, खातगुण, कटगुण, रेवलकरवाडी, जांब, रामेश्वर, रामोशीवाडी, बिटलेवाडी, जाखणगाव, गादेवाडी, अमलेवाडी, भांडेवाडी, खटाव, हुसेनपुर, धारपुडी, दरजाई यांचा समावेश आहे. 

कातरखटावमध्ये दरुज, सुंदरपूर, पेडगाव, मांडवे, तडवळे, सातेवाडी, हिंगणे, बोंबाळे, डांभेवाडी, डाळमोडी, गणेशवाडी(वडूज), कातरखटाव, येरळवाडी, येलमरवाडी, एनकुळ, कणसेवाडी, खातवळ, कान्हरवाडी, हिवरवाडी, पडळ, दातेवाडी, सुर्याचीवाडी, बनपूरी, पळसगाव, मानेतुपेवाडी यांचा समावेश आहे.

निमसोडमध्ये अंबवडे, पिंपरी, गोरेगाव निं, धोंडेवाडी, मरडवाक, मोराळे, गुंडेवाडी, पोपळकरवाडी, निमसोड, गोसाव्याचीवाडी, कुमठे, नायकाचीवाडी, उंबर्डे, नढवळ काळेवाडी, गुरसाळे, दहिवड पुनर्व, गोपूज, पळशी, वाकळवाडी, शिरसवडी यांचा समावेश आहे. 

औंध गटात अंभेरी, कोकराळे, भोसरे, वडखळ, लोणी, धकडवाडी, सिद्धेश्वर कुरोली, भुरकवडी, वाकेश्वर, जायगाव, वरुड, खबालवाडी, औंध, गणेशवाडी (औंध), नांदोशी, त्रिमली, लांडेवाडी, करांडेवाडी, येळीव, खरशिंगे यांचा समावेश आहे.

म्हासुर्णेमध्ये वडी, कळंबी, गिरीजाशंकरवाडी, पुसेसावळी, थोरवेवाडी, लक्ष्मीनगर, उंचीठाणे, कातवडी पूनर्व, राजाचे कुर्ले, पारगाव, गोरेगाव वांगी, लाडेगाव, रेवली पू, मुसांडवाडी, होळीचागाव, भुषणगड, रहाटणी, कासारस्थळ पू, वडगव ज. स्वा, चोराडे, शेनवडी, पुनवडी पू, कामथी तर्फ परळी, म्हासुर्णे यांचा समावेश आहे.

मायणीमध्ये मायणी, चितळी, शेडगेवाडी, नित्रळ पू, अनफळे, कानकात्रे, ढोकळवाडी, विखळे, पाचवड, गारुडी, मुळीकवाडी, तरसवाडी, गारळेवाडी, कलेढोण यांचा समावेश आहे. 

कोरेगाव तालुक्यात पिंपोडे बुद्रुकमध्ये सोळशी, सायगाव, नांदवळ, रणदुल्लाबाद, मोरबेंद, चवणेश्वर, करंजखोप, जगतापवाडी, सर्कलवाडी, चौधरवाडी, सोनके, भावेनगर, पिंपोडे बुद्रुक, घिगेवाडी, राऊतवाडी, वाघोली, दहिगाव, अनपटवाडी, आसनगाव, शहापूर या गावांचा समावेश आहे. 

वाठारस्टेशनमध्ये तडवळे संमत वाघोली, वाठार स्टेशन, जाधववाडी, तळीये, फडतरवाडी, विखळे, बिचुकले, नलवडेवाडी बि, देऊर, दुधनवाडी, बनवडी, अरबवाडी, खामकरवाडी, पिंपोडे खु, अंबवडे स. वाघोली, रेवडी, तांबी, परतवडी, भक्तवडी, कोलवडी, पळशी, खडखडवाडी, गुजरवाडी, अंबवडे सं, कोरेगाव यांचा समावेश आहे. 

सातारारोडमध्ये सातारारोड, धुमाळवाडी, बर्गेवाडी, खेड नांदगिरी, चंचळी, घाडगेवाडी, भिमनगर, दरे तर्फ तांब, चिलेवाडी, हासेवाडी, भाडळे, नागेवाडी, बोथेवाडी, कवडेवाडी, हिवरे, मदनापूरवाडी, जांब खु, होलेवाडी, किन्हई, पेठ किन्हई, शेंदूरजणे, सिद्धार्थनगर, आझादपूर(न्हावी खु), रुई, अनभुलेवाडी, बोरजाईवाडी यांचा समावेश आहे. 

कुमठे मध्ये सांगवी, भोसे, कुमठे, आसरे, चिमणगाव, बोधेवाडी, तडवळे सं. कोरेगाव, भांडारमाची, रामोशीवाडी, भाटमवाडी, आसगाव, चांदवडी, बोबडेवाडी, जळगाव, भाकरवाडी, जांब बु, ल्हासुर्णे, त्रिपुटी, भिवडी, जरेवाडी, मुगाव, तांदुळवाडी, मंगळापूर, शिरढोण यांचा समावेश आहे. 

एकंबेमध्ये गोळेवाडी, सुलतानवाडी, कठापूर, गोगावलेवाडी, गोडसेवाडी, एकसळ, न्हाळेवाडी, वेल्ींग शि, शिरंबे, एकंबे, सायगाव ए, शेल्टी, खिरखिंडी, दुधी, निगडी, वाघजाईवाडी, धामणेर, सायगाव धा, साप, कण्हेरखेड, काटेवाडी, वेलंग क, जायगाव, सासुर्वे, बोरीव, अपशिंगे, अंभेरी, वेळू, बेलेवाडी यांचा समावेश आहे.

वाठार किरोलीमध्ये बोरगाव, चोरगेवाडी, सुर्ली, पिंपरी, आर्वी, केंबडवाडी, नागझरी, जयपूर (न्हावी बु), पवारवाडी, वाठारकिरोली, मोहितेवाडी, तारगाव, दुर्गळवाडी, काळोशी, रिकिबदारवाडी, नलवडेवाडी ता., साठेवाडी, टकले, गुजरवाडी, किरोली यांचा समावेश आहे. 

वाई तालुक्यात यशवंतनगर अभेपूरी, पाचपुतेवाडी, वडाचीवाडी, वेलंग, धोम, गाढवेवाडी, आसरे, आंबेदरेवाडी, पानस, रेणावळे, खावली, अकोशी, वासोळे, वडोली, घेराकेंजळ, कोहळी, कोढावळे, किरेंडे, आसगाव, चांदवडी, भिवडी, गोवे, वाशिवली, जांभळी, नांदगणे, परतवडी, गोळेगाव, गोळेवाडी, उळुंब, बलकवडी, वयगाव, दह्याट, जोर, कोंढवली बुद्रु, कोंढवली खु, बोरगाव बु, बोरगव खु, मालतपूर, यशवंतनगर, सिद्धनाथवाडी, सोनगीरवाडी, पसरणी, बोरीव, व्हाहळी कॉ, चिखली, वाडकरवाडी, दसवडी, कुसगाव, विट्ठलवाडी, मुगाव, न्हाळेवाडी, एकसर यांचा समावेश आहे. 

बावधनमध्ये मेणवली, शेलारवाडी, भोगाव, पांडेवाडी, धावडी, गुंडेवाडी, पिराचीवाडी, मांढरदेव, कोचळेवाडी, बालेघर, बोपर्डी, लोहारे, सुलतानपूर, परखंदी, मुंगसेवाडी, सटालेवाडी, वरखडवाडी, येरुळी, डुईचीवाडी, बावधन, शहाबाग, वाई ग्रामीण, वाघजाईचीवाडी, पांढरेचीवाडी, शेलारवाडी, कण्हुर, दरेवाडी, अनपटवाडी, नागेवाडी, कडेगाव, व्याहळी पू, व्याजवाडी, जांभुळणे, मालुसरेवाडी यांचा समावेश आहे. 

ओझर्डे गटातून केंजळ, सुरुर, मोहोडेकरवाडी, वेळे, भिलारवाडी, चांदक, आनंदपूर, खानापुर, पांडे, ओझर्डे,  कवठे, धोम पुर्न, बोपेगाव, शिरगाव, अनवडी, देगाव, लगडवाडी, मापरवाडी, वाकणवाडी, वहागाव या गावांचा समावेश आहे.

भुईंजमध्ये भुईंज, बदेवाडी, भिरडाचीवाडी, मालदेववाडी, किकली, बेलमाची खालची, वरची, काळंगवाडी, गोवेंदिगर, खोलवडी, राऊतवाडी, किसनवीरनगर, चांदवडी पू, भिवडी पु, पाचवड, उडतारे, कळंबे, विरमाडे, चिंधवली, अमृतवाडी, खडकी, आसले, पिराचीवाडी, गोंधळवाडी, जांब, निकमवाडी या गावांचा समावेश करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अन्यायकारक कर प्रणालीच्या विरोधात मद्य विक्रेता संघाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
पुढील बातमी
गणरायाच्या विसर्जनासाठी कार्यकर्त्यांची कायमस्वरूपी तलावाची मागणी

संबंधित बातम्या