सातारा : सुमारे 20 लाखांच्या फसवणूक प्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविराज सुभाष शिंगटे राहणार मर्ढे, ता. सातारा यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने शुभम विजय काळभोर रा. लोणी काळभोर, रायवाडी, ता. हवेली, जि. पुणे यांनी 19 लाख 79 हजार 999 रुपये शिंगटे यांच्याकडून घेऊन त्यांना परतावा न देता शिंगटे यांची फसवणूक केल्याबाबतची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.