पंचायत समितीच्या नूतन इमारतीत भाऊसाहेब महाराजांचे स्मारक उभारावे

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांचे निवेदन

by Team Satara Today | published on : 18 June 2025


सातारा : राज्य शासनाने सातारा तालुका पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. येत्या तीन वर्षात अद्ययावत इमारत त्याच जागेत उभी राहणार आहे. या इमारतीच्या प्रांगणात सहकार महर्षी अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांनी केली आहे.

त्यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना सादर केले. यावेळी जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक व्यंकटराव मोरे, अजिंक्यतारा सूतगिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर, मार्केट कमिटीचे उपसभापती मधुकर पवार, रवी पवार, योगेश जाधव, मोहित कुस्पे, संतोष घुले, प्रदीप बारटक्के, अमोल गुजर, जयवंत पवार, अनिल फाळके इत्यादी उपस्थित होते.

या निवेदनात नमूद आहे की, सहकार महर्षी श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे उर्फ भाऊसाहेब महाराज यांनी सातारा तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. ग्रामीण विकास सहकारातून प्रगती सामाजिक स्वास्थ्य आणि दैनंदिन जीवनाशी निगडित विकास कामांचे अजिंक्य पर्व त्यांनी निर्माण केले. जनतेने भाऊसाहेब महाराजांना विकासरत्न ही पदवी बहाल केली. सद्यस्थितीत पंचायत समितीकरता नवीन प्रशासकीय इमारत उभी राहत आहे. भाऊसाहेब महाराजांच्या महान कार्याची आठवण म्हणून त्यांचा पूर्णाकृती पुतळा या इमारतीच्या प्रांगणात असावा, अशी संपूर्ण सातारा तालुकावासियांची आणि शहरवासीयांची इच्छा आहे. याबाबत राज्य शासनाकडून आमच्या मागणीचा जरूर विचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एमआयएम चे नेते इम्तियाज जलील यांच्या पुतळ्याचे दहन
पुढील बातमी
आरोग्य विभागाने डावलला कॅथलॅबचा नियम

संबंधित बातम्या