पोवईनाका परिसरात अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी युवकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 29 May 2026


सातारा : सातारा शहरातील पोवईनाका परिसरात पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूस अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा हात पकडत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयिताविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 28 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संशयित आशिष वाघमोडे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याने पीडित मुलीचा पाठलाग करून तिचा हात पकडला व तु माझ्यासोबत चल, असे म्हणत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी सातारा शहर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा ! ना. उदय सामंतांचा सातार्‍यातून थेट इशारा; महेश शिंदेंना कानमंत्र, जयकुमार गोरेंवर सूचक निशाणा
पुढील बातमी
जकातवाडी गावच्या हद्दीत टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर; सातारा तालुका पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या