सातारा : सातारा शहरात असणार्या तेली खड्डा परिसरातील जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तेली खड्डा परिसरात जुगार प्रकरणी पोलिसांनी छापा टाकून मन्सूर शफिउल्ला मुल्ला (वय 37, रा. गुरुवार पेठ, सातारा. मूळ रा.इस्लामपूर जि.सांगली) याच्यावर सातारा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याच्याकडून रोख 760 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.