अजिंक्यतारा' ही पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव सक्षम सूत गिरणी 

सौ. वेदांतिकाराजे; सूत गिरणीची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न 

by Team Satara Today | published on : 28 August 2024


सातारा : स्व. भाऊसाहेब महाराजांनी दूरदृष्टी ठेवून अजिंक्य उद्योग समूहाची निर्मिती केली. आज अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना या मातृसंस्थेसोबतच अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणी ही संस्थाही सक्षमपणे सुरु आहे. सूत गिरणीचे सूत देशासह परदेशी बाजारपेठेत निर्यात केले जात आहे. असंख्य सूत गिरण्या अडचणीत असतानाही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अजिंक्यतारा सूत गिरणी भक्कपणे कार्यरत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव सक्षम सूत गिरणी म्हणून अजिंक्यतारा सूत गिरणीचा नावलौकिक आहे, असे प्रतिपादन संस्थेच्या मार्गदर्शिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. 

वळसे ता. सातारा येथे अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या आणि उत्साहाच्या वातावरणात सपंन्न झाली. या सभेत सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. सभेच्या अध्यक्षस्थानी गिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर होते. यावेळी व्हा. चेअरमन बापूसाहेब महाडिक, अजित साळुंखे, जगन्नाथ किर्दत, गुलाब भोसले, सौ. लता जाधव, रत्नमाला डांगे, सर्जेराव सावंत, दिलीप निंबाळकर, आबासो साबळे, महिपती ठोके, शिवाजीराव जाधव, बाळासाहेब लोहार, विष्णू सावंत, भानुदास मोहिते, मधुकर यादव, मोहनराव जाधव, अंकुश डांगे, भानुदास चवरे, कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी यांच्यासह सर्व पदाधिकारी, आजी- माजी संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती. 

स्व. भाऊसाहेब महाराजांच्या सभासद हित जोपासण्याच्या विचारधारेला अनुसरून आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य उद्योग समूहाची यशस्वी घोडदौड सुरु आहे. अजिंक्यतारा सूत गिरणीच्या प्रगतीचा आलेख कायम चढता राहिला असून सभासद, कामगार- कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे सूत गिरणी देशात नावलौकिक मिळवेल, असे सौ. वेदांतिकाराजे भोसले म्हणाल्या. 

चीफ अकाउंटंट मानसिंग पवार यांनी सभेपुढील विषयांचे वाचन केले. सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. चेअरमन नावडकर यांनी प्रास्ताविक केले. संचालक अजित साळुंखे यांनी स्वागत केले. संचालक जगन्नाथ किर्दत यांनी आभार मानले. सभेला सर्व पदाधिकारी, सभासद आणि कामगार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वीर मुरारबाजी…पुरंदरकी युद्धगाथा’ चित्रपट रुपेरी पडदयावर येण्यासाठी सज्ज
पुढील बातमी
दही आणि दालचिनी मिसळून खाल्ल्याने महिलांच्या आरोग्याला अनेक फायदे

संबंधित बातम्या