सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वतोपरी मदत करणार आहे. महायुतीचा धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली जाईल. पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी सक्रियपणे कामाला लागावे, असे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्यासाठी साताऱ्यातील हॉटेल लेक व्ह्यू येथे पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ना. मकरंद पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. यावेळी खा. नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, राज्य सरचिटणीस प्रतापराव पवार, किसनवीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय देसाई, सुनील माने, अनिल देसाई, सुरेंद्र गुदगे, विक्रमबाबा पाटणकर, श्रीनिवास शिंदे, सत्यजित वीर, पृथ्वीराज गोडसे, स्मिता देशमुख, संजय गायकवाड, मनोज देशमुख, सीमा जाधव, शिवाजीराव महाडिक, रामराव लेंभे, प्रदीप विधाते, विक्रम शिंगाडे, मनोज पोळ, सादिक इनामदार, राजूकाका भोसले, अशोकराव जाधव, बबनराव साबळे, गजानन जाधव, महादेव मस्कर, सभापती विक्रांत डोंगरे, संतोष वीर, शकुंतला चोरमले, जि. प. सदस्य वृषाली चव्हाण, शुभांगी जाधव, संजय केळघणे, बापू शिंदे, संदीप मांडवे, विजया थोरात यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. मकरंद पाटील म्हणाले, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे. या निवडणुकीत पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा उपयोग महायुतीच्या उमेदवाराला विजय मिळवून देण्यासाठी केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण ताकद डॉ. स्मिता जाधव यांच्या पाठीशी उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुठलाही किंतु, परंतु मनात न ठेवता डॉ. स्मिता जाधव यांना विजयी करायचे आहे.
खा. नितीन पाटील म्हणाले, राज्यपातळीवर जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतर महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतात, त्यानुसार कार्यकर्त्यांनी वाटचाल करायची असते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कोणताही संभ्रम न ठेवता डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी काम करावे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने मतदारांपर्यंत पोहोचून डॉ. स्मिता जाधव यांना मतदान करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी संघटितपणे काम करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी केले.
डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीही मैदानात; विजयासाठी सक्रियपणे कामाला लागण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा आदेश
by Team Satara Today | published on : 20 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा