इराण
: इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे अमेरिकेने आता मोठा निर्णय़ घेतला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून युद्धासारखी परिस्थिती आहे. दोन्ही देश माघार घ्यायला तयार नाहीत. हमास आणि हिजबुल्लाहच्या विरोधात सुरु असलेल्या कारवाई दरम्यान इस्रायलला आता इराणच्या हल्ल्याचाही सामना करावा लागतो आहे. त्यामुळे त्याच्या मदतीसाठी अमेरिका भक्कमपणे त्याच्या पाठिमागे उभा आहे. एकेकाळी एकमेकांचे मित्र असलेले हे देश आज एकमेकांच्या विऱोधात उभे आहेत. यामागची कारणे बरीच आहेत. पण तणाव वाढला असताना आता अमेरिकेने बॉम्बर विमाने, लढाऊ विमाने आणि नौदलाची विमाने पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी मेजर जनरल पॅट रायडर यांनी ही माहिती दिलीये.
अमेरिकेने तैनात केले लढाऊ विमाने
1 ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर 180 हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. त्यानंतर 25 दिवसांनी इस्रायलने इराणच्या लष्करी तळांवर लढाऊ विमान पाठवून हल्ला केला. आता इराणने पुन्हा एकदा इस्रायलला प्रत्युत्तराला उत्तर देण्यासाठी हल्ल्याची तयारी केली आहे. यामुळेच अमेरिकेने मध्यपूर्वेत अधिक विमाने तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेने B-52 बॉम्बर, लढाऊ विमाने, टँकर विमाने आणि नौदल विनाशक या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. ही विमाने पश्चिम आशियामध्ये लवकरच पोहोचतील. दुसरीकडे, यूएसएस अब्राहम लिंकन युद्धनौका अमेरिकेत परतणार आहे. यूएसएस अब्राहम लिंकन विमानवाहू नौका आणि त्याच्या स्ट्राइक ग्रुपमधील तीन विनाशक लवकरच सॅन दिएगो बंदरावर पोहोचतील.
अमेरिकेचा इराणला इशारा :
कोणत्याही परिस्थितीत इस्रायलचे संरक्षण करणार असल्याचे अमेरिकेने आधीच म्हटले आहे. 1 ऑक्टोबर रोजी इराणने जो हल्ला केला होता तो निष्फळ करण्यासाठी अमेरिकेने देखील इस्रायलला मोठी मदत केली होती. इस्रायलच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणला स्पष्ट इशारा दिला आहे. इस्रायलने आमचा बदला पूर्ण झाला असल्याचं म्हटले होते. आता जर पुन्हा इराणने हल्ला केला तर त्याला वाईट परिणाम भोगावे लागतील असेही इस्रायलने इशारा देत म्हटले होते. त्यामुळे इराणने इस्रायलवर हल्ला करण्याची चूक करू नये, असे अमेरिकेने म्हटले आहे.
इराण लष्करी तळाचे इस्रायलने हल्ले करत मोठे नुकसान केले आहे. या तळावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जात होती. तो तळच इस्रायलने नष्ट केला आहे. अमेरिकेटचे प्रेस सेक्रेटरी मेजर जनरल पॅट रायडर म्हणाले की, जर इराण किंवा त्याचे प्रॉक्सी हे अमेरिकन कर्मचारी किंवा हितसंबंधांना लक्ष्य करत असतील तर युनायटेड स्टेट्स आपल्या लोकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल.
दुसऱ्यांदा B-52 विमाने तैनात :
एका महिन्यात अमेरिकेने दुसऱ्यांदा B-52 बॉम्बर मध्यपूर्वेत तैनात केले आहेत. हे अण्वस्त्र सक्षम विमान आहे. अमेरिकेने याच महिन्यात येमेनमधील हुथी बंडखोरांवरही याच विमानाने हल्ला केला होता. सध्या येथे ४३ हजार अमेरिकन सैनिक तैनात आहेत. आता बॉम्बर विमाने तैनात केल्यामुळे अमेरिकेची स्थिती आणखी मजबूत झाली आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |