सातारा : मंगळवारी सांयकाळी सातारा शहरात विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाल्यानंतर हाणामारीच्या दोन घटना घडल्या. देवी चौक व शाहू चौक परिसरात दोन विविध गटात मारामारी झाली. गणपती मंडळ व जुन्या वादाच्या कारणातून कोयत्यासह धारदार शस्त्राने वार झाले. या दोन हाणामारींच्या घटनांमध्ये परस्पर विरोधी असे चार गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पहिली मारामारीची घटना देवी चौक परिसरात घडली आहे. या घटनेप्रकरणी शेखर संजय घाडगे (वय ३४. रा. केसरकर पेठ, सातारा) यांनी आकाश कांबळे, शुभम कांबळे, रोहित कांबळे, शनी कांबळे, शौर्य कांबळे, तनिष्क कांबळे, बालक कांबळे, पालक कांबळे, संतोष कांबळे, चिक्या कांबळे (सर्व रा.दुर्गा पेठ, सातारा) यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. याच प्रकरणात दुसरी तक्रार शुभम सनी कांबळे (वय २२, रा. दुर्गा पेठ) यांनी शेखर घाडगे, स्वप्नील दबडे, आकाश बडेकर, बंडू मोहिते, अभिषेक घाडगे, विवेक घाडगे, रोहित घाडगे, मोनू घाडगे, सचिन घाडगे, चिकू घाडगे (सर्व रा. दुर्गा पेठ) यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे.
दुसरी घटना शाहू चौक येथे घडली आहे. याप्रकरणात पहिली तक्रार पवन दत्तात्रय जाधव (वय २१, रा. केसरकर पेठ, सातारा) यांनी गौरव पाटणकर, बलराम कुर्हाडे, अनिल मोरे, ऋषीकेेश विटकर, गोपाळ पाटणकर, सचिन पाटणकर, साहिल इनामदार, यशवंत विटकर, अंकुश मोरे, (सर्व रा.केसरकर पेठ) यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. या प्रकरणात दुसरा गुन्हा दत्तात्रय जाधव, पवन जाधव, समाधान जाधव (सर्व रा.केसरकर पेठ, सातारा) यांच्या विरुध्द दाखल झाला आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
