सातारा : भोंदवडे(पो. गजवडी ता. सातारा) गावातील पत्र्याचे शेड उचकटुन चोरट्याने काजुचा माल व 70 हजार रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी विक्रम विश्वास शिंदे (वय 29) यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भोंदवडे गावात विक्रम शिंदे यांच्या कारखान्याचे पत्र्याचे शेड आहे. या शेड मध्ये त्यांनी काजुची पोती ठेवली होती. मंगळवार दि. 8 रोजी मध्यरात्री चोरट्याने पत्र्याचे शेड उचकटून आत प्रवेश केला. ही काजुची पोती व 70 हजार रूपये रोख रक्कम असा 1 लाख 60 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याची माहिती मिळताच विक्रम यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव करत आहेत.
पत्र्याचे शेड उचकटून काजुचा माल व रोख रक्कम लंपास
भोंदवडे गावातील घटना : 1 लाख 60 हजाराचा मुद्देमाल नेला चोरून
by Team Satara Today | published on : 11 October 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
श्रीपतराव पाटील हायस्कूलमध्ये "आनंददायी शनिवार" उत्साहात साजरा
December 24, 2025
सातारा शहर पोलिसांचा सिव्हिल हॉस्पिटलनजीक जुगार अड्ड्यावर छापा
December 24, 2025
सैदापूर येथे डंपरच्या धडकेमध्ये निवृत्त शिक्षकाचा मृत्यू
December 24, 2025