सातारा : शिवथर, ता. सातारा येथील एकाचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना 9 नोव्हेंबर रोजी सकाळी पाचच्या दरम्यान घडली आहे. देवानंद आनंदराव साबळे (वय 50) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
हर्षद कल्याण साबळे यांनी या प्रकरणाची खबर सातारा तालुका पोलीस स्टेशनला दिली आहे. प्राप्त माहितीनुसार मृत साबळे हे घरामध्ये झोपले होते. मात्र ते सकाळी उठलेच नाहीत त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय सातारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.