सातारा : कोणतेही स्पष्ट कारण नसताना पाळीव कुत्र्यावर कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना बोरगाव (ता. कोरेगाव) येथे 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी रहिमतपूर पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विष्णू जगन्नाथ पवार (वय 49, रा. बोरगाव) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार वसंत पवार (रा. बोरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या घराजवळील सार्वजनिक रस्त्यावर संजय रघुनाथ घाडगे यांच्या घरासमोर हा प्रकार घडला. आरोपीने पवार यांच्या पाळीव कुत्र्यावर अचानक हल्ला करून त्याच्या पाठीत कोयत्याने वार केला. यात कुत्रा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रहिमतपूर पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून त्याबाबत तपास सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार जे. जी. भुजबळ करीत आहेत.
पाळीव कुत्र्यावर कोयत्याने वार; एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 13 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा