सातारा : विसावा नाका परिसरात अज्ञात चोरट्यांनी 25 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 ते 14 दरम्यान विनायक प्रकाश कांबळे रा. दत्तात्रय अपार्टमेंट, विसावा नाका, सातारा यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील 25 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार अवघडे करीत आहेत.