01:47pm | Nov 07, 2024 |
सातारा : सातारा-जावली मतदारसंघात आजवर हजारो कोटींची विकासकामे मार्गी लावली आहेत. हद्दवाढ मंजूर करून त्रिशंकू भागाला विकासाच्या प्रवाहात आणले आहे. सातारा शहरासह हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागातील असंख्य विकासकामे प्रगतीपथावर आहेत. सातारा शहर, सातारा आणि जावली तालुक्यातील सर्व प्रकारचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून यापुढेही मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवले जातील. मतदारसंघात सुरु असलेले विकासपर्व अखंडित ठेवण्यासाठी मला मताधिक्य देऊन विजयी करा, असे आवाहन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
सातारा-जावली विधानसभेचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे यांच्या प्रचारार्थ गुरुवार सकाळी सातारा शहरातील एमजीपी कार्यालय, एसटी कॉलनी, फिनिक्स बंगला, अजिंक्य बाजार चौक, जगताप हॉस्पिटल, काळोखे वस्ती, मशीद, मारुती मंदिर, रणजित साळुंखे घर, माळी आळी, छ. अभयसिंहराजे भोसले कमान, हायवेने मस्केवाडा, जिजामाता उद्यान, बागड वस्ती, गोडोली चौक, जुनी शाळा, भैरवनाथ मंदिर, खामकर चौक, साई पतसंस्था, गोडोली जकात नाका अशी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, आरपीआयसह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दोन्ही आघाड्यांचे सर्व आजी - माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पदयात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. पदयात्रेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाल्याने पदयात्रा मार्गाला यात्रेचे स्वरूप आले होते. पदयात्रामार्गावर ठिकठकाणी माता- भगिनींनी शिवेंद्रराजेंचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले. शिवेंद्रराजेंनी पदयात्रा मार्गावरील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा शहर आणि सातारा जावलीतील जनतेचे आणि माझे अतूट असे नाते आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या विचारसरणीने माझे मार्गक्रमण सुरु आहे. जनतेचे प्रेम आणि साथीमुळेच मी मतदारसंघात विकासाचा झंजावात केला आहे. सर्व प्रकारच्या समस्या सोडवतानाच नागरिकांच्या मागणीनुसार विकासकामे मार्गी लावली आहेत. निवडणूक आली की, पावसाळ्यात उगवणाऱ्या भूछत्रासारखे काही लोक उगवतात. पाच वर्ष कधीही न दिसणारे लोक निवडणूक आली कि मतदारसंघात घिरट्या घालू लागतात. अशा भूछत्रांना जनता कधीच भुलणार नाही, हे 'त्यांना'ही माहिती आहे. माझा विजय निश्चित असून १ नंबरच्या मताधिक्याने मला विजयी करावे, असे आवाहन शिवेंद्रराजेंनी केले.
शुक्रवार दि. ८ रोजी सकाळी ७ वाजता मोना स्कुल, करी आप्पा चौक, लक्ष्मी टेकडी, लतीफभाई चौधरी घर, पोलीस चौकी, बाजारपेठ, आमणे बंगला, भीमाबाई आंबेडकर चौक अशी पदयात्रा, सायंकाळी ५ वाजता मार्केट यार्ड आणि सायंकाळी ७ वाजता रवी ढोणे कॉलनी, चिमणपुरा येथे कोपरा सभा होणार आहे. पदयात्रा व कोपरा सभांना सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |
सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले |