पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक

by Team Satara Today | published on : 02 June 2025


सातारा : पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस असल्याचे खोटे सांगून वृध्दाचे सोन्याचे 70 हजार रुपये किंमतीचे दागिने फसवणूक करुन चोरल्याप्रकरणी दोन अनोळखी विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 1 जून रोजी मंगळवार तळे परिसरात घडली आहे. याप्रकरणी प्रमोद नारायण नातू (वय 65, रा. मंगळवार तळे परिसर, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवैधरित्या जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
राहत्या घरातून युवती बेपत्ता

संबंधित बातम्या