सातारा : म्हसवे परिसरात अज्ञात चोरट्याने सुमारे 42 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 ते 22 दरम्यान म्हसवे, ता. सातारा येथील मलबार हॉटेल शेजारील किशोर नाथजी राजगुडे रा. मातोश्री अपार्टमेंट, सातारा यांच्या पान टपरी चे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने टपरी मधील 41 हजार 373 रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार माने करीत आहेत.