सातारा : कॉपीराईट प्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील अनिल फॅशन ऍन्ड ऍक्सेसरीज दुकानाचा चालक मोहन हिंदुराव पवार (वय 49, रा. पुसेगाव ता.खटाव) यांच्या विरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात कॉपीराईटचा गुन्हा दाखल झाला आहे. दि. 18 ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. दुकानातमध्ये प्युमा कंपनीचे 25 हजार 270 रुपये किंमतीचे बनावट कपडे विक्रीसाठी ठेवले आहेत. यावरुन महेंद्र देवरा यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार एस. एस. देशमुख करीत आहेत.