सरळ चालण्याऐवजी उलटे चालण्याचे अनेक फायदे

by Team Satara Today | published on : 21 August 2025


निरोगी राहण्यासाठी योगा, व्यायाम करणे गरजेचे असते तसेच चालणे हा सर्वात महत्त्वाचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. अनेक आरोग्यतज्ज्ञांनी देखील हे म्हटलं आहे की दररोज किमान 15 मिनिटे चाललं पाहिजे. दररोज चालणे फायदेशीर मानले जाते. पण तुम्हाला माहितीये का फास्ट चालणे, किंवा धावणे यासोबतच आता उलटे चालणे हा देखील एक ट्रेंड आहे.होय, सरळ चालण्यासारखंच हळूहळू उलटे चालणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. तुम्ही कधी असा प्रयोग केलाय का? चला जाणून घेऊयात नक्की याचे काय फायदे आहेत ते.

ते शरीरासाठी कसे फायदेशीर आहे?

एका वृत्तानुसार मागे चालल्याने कमी वापरल्या जाणाऱ्या पायांच्या स्नायूंमध्ये ताकद वाढते, चालण्याचे तंत्र आणि पद्धत सुधारते, संतुलन निर्माण करण्यास मदत होते, कॅलरीज बर्न होतात आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय मागे चालल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होतात. यामुळे ऊर्जा पातळी आणि चयापचय वाढण्यास मदत होते.

तुम्ही उलटे चालता तेव्हा….

त्याचसोबत जागरूकता वाढवते, मूड सुधारण्यास मदत होते. झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. तुम्ही उलटे चालता तेव्हा तुमचा मेंदू अंदाज लावत राहतो, ज्यामुळे तुमची विचार करण्याची क्षमता वाढते. इंद्रिय अधिक सक्रिय होतात. ज्यामुळे दृष्टी सुधारते. संतुलन राखण्यास देखील मदत होते.

पायांची सहनशक्ती आणि एरोबिक क्षमता जलद सुधारण्यास मदत

आपण दररोज सामान्यपणे सरळ चालतो तेव्हा आपण काहीही विचार न करता पुढे पाऊल टाकत असतो. परंतु जेव्हा आपण मागे पाऊल टाकतो तेव्हा ते आपल्या पायांची सहनशक्ती आणि एरोबिक क्षमता जलद सुधारण्यास मदत करू शकते. मागे चालताना ट्रेडमिल किंवा घरामध्ये प्रयोग करणे अधिक सुरक्षित मानले जाते.

मागे चालताना कोणती काळजी घ्यावी?

मागे चालण्यासाठी, प्रथम सुरक्षित जागा निवडा. सुरुवातीला तुमच्या घराजवळील एखाद्या उद्यानात, ट्रॅकवर किंवा सरळ घरातील हॉलमध्ये हळू हळू सराव करा. जिथे कोणताही अडथळा किंवा पडण्याची भीती नसेल अशा ठिकाणी हा सराव करा. जर तुम्ही हे सुरू करत असाल तर तुमच्यासोबत कोणीतरी असल्यास अजून चांगलं आहे. मागे चालताना लक्ष विचलित झाल्यामुळे दुखापत होण्याचा किंवा पडण्याचा धोका असतो. म्हणून, मागे चालताना नीट काळजीपूर्वकच चाला. सुरुवातीला हळूहळू पावलं टाका आणि सराव करा.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रायगड समुद्रात मासेमारी बोट बुडाली
पुढील बातमी
कराडला युवकांच्या मदत कार्याने गणेश मुर्ती सुरक्षीत स्थळी

संबंधित बातम्या