सातारा : महालक्ष्मी पतसंस्था सातारा या ठेवीदारांचे ठेवी परत मिळवण्यासाठी साखळी व चक्री उपोषण गेल्या तीन दिवसात पासून सुरु होते. त्यावेळी पतसंस्थेतील व जिल्हा प्रशासकीय अधिकारी निबंध कार्यालयातील अधिकारी कोणीही आंदोलन कर्त्याना भेटले नाहीत दरम्यान, आ. शशिकांत शिंदे हे आंदोलन स्थळी आंदोलनकर्त्यांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन येत्या विधानसभा अधिवेशनामध्ये ठेवीदारांसाठी लक्षवेधी मांडून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले.
गेले तीन दिवसापासून ठेवीदार आंदोलनकर्ते साखळी चक्री उपोषण करत आहे. ही बाब आमदार शशिकांत शिंदे यांना समजताच त्यांनी या आंदोलनस्थळी भेट दिली व हा प्रश्न ठेवीदारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे विषत मांडून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी आ. शिंदे प्रयत्न करणार आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी येथे आंदोलनस्थळी सर्व ठेवीदारांनी आ. शशिकांत शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी महालक्ष्मी पतसंस्थेचे सर्व ठेवीदार उपस्थित होते.