सातारा : सातारा शहर पोलिसांनी जुगार प्रकरणी दोनजणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यातील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात जुगार प्रकरणी शुभम उर्फ जगीरा सत्यवान कांबळे (वय 27, रा.प्रतापसिंहनगर,सातारा) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एलसीडी स्क्रीन, रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा 10 हजार 560 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पत्र्याच्या शेडमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
दुसरी कारवाई मंगलदास शिवदास बाबर (वय 56, रा.सदरबझार) याच्यावर करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एलसीडी स्क्रीन, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा 27 हजार 380 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.