सातारा एसटी स्टँड परिसरात अज्ञात महिलेने लांबवले एक लाख 7 हजार रुपयांचे दागिने

by Team Satara Today | published on : 27 October 2025


सातारा : सातारा एसटी स्टँड परिसरात अज्ञात महिलेने फिर्यादी महिलेच्या पिशवीमधील एक लाख 7 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हातोहात लांबवले. ही घटना 26 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता घडली.  याप्रकरणी निर्मला अर्जुन बुधावले (वय 56,  रा. नवी मुंबई) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्राप्त फिर्यादीनुसार फिर्यादी महिला एसटी बस ने साताऱ्यात आली होती. तिथून बाहेर पडत असताना त्यांच्या पिशवीतील 80 हजार रुपयांचे तीन तोळे वजनाचे गंठण वीस हजार रुपये किमतीचे अर्ध्या तोळे वजनाची चैन, कानातील बाळी, दोन हजार रुपये किमतीची चांदीची एक मनगटी जोडी व पाच हजार रुपये किमतीचे सोन्याच्या दोन डोरल्याच्या वाट्या असे सोन्याचे दागिने अज्ञात महिलेने लांबवले. प्रवासादरम्यान पिशवी वजनाला हलकी लागल्याने सदर महिलेने तपासले असता दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक एस के पवार अधिक तपास करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा-लोणंद-शिरवळ रस्ता रुंदीकरणाची कामे दर्जेदार करावीत; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

संबंधित बातम्या