जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सकाळी दहा वाजता सुरुवात होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता रॅलीत सहभागी झालेल्या शिवप्रेमींना संग्रहालयामध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. याची माहिती अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली आहे.
सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवरायांची पत्रे यावर इतिहास संशोधक घनश्याम ठाणे यांचे मोडी लिपीच्या अनुषंगाने व्याख्यान होणार आहे. वसंत चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला तहसीलदार नागेश गायकवाड, युवा राज्य फाउंडेशनचे अध्यक्ष महारुद्र तिकुंडे, ग्रुप सातारा चे अध्यक्ष गणेश शिंदे, वेद बचत मार्केटिंग कार्पोरेशनचे अध्यक्ष सुभाष गायकवाड उपस्थित राहणार आहेत. शिवाजी जयंती निमित्त छत्रपती शिवाजी संग्रहालय सकाळी दहा ते पाच या वेळेत विनामूल्य दर्शनासाठी उपलब्ध राहणार आहे.