सातारा : अल्पवयीन मुलास मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक एक रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आकाशवाणी केंद्र पाठीमागे, सातारा येथील प्रीतम प्रकाश वायदंडे या अल्पवयीन मुलास मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच आदित्य महेश बाबर, साहिल प्रकाश चव्हाण, पवन विक्रम मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मदने करीत आहेत.