मालगाव गावच्या हद्दीत धोम डावा कालव्‍यात पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 11 May 2026


सातारा : पाण्यात बुडल्याने एखादा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मालगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत धोम डावा कालव्‍यात अरुण हरी परिवार (वय ११, सध्या रा. किकली, ता. वाई मूळ रा. नेपाळ देश) या मुलाचा बुडून मृत्‍यू झाला. ही घटना दि. १० मे रोजी घडली आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. परिवार कुटुंब माेलमजुरी करुन गुजराण करत आहे. सध्या मालगाव परिसरात ते उपजिवीकेसाठी वास्‍तव्‍य करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मंत्र्यांचे ताफे, सुरक्षा व्यवस्था व हेलिकॉप्टर दौऱ्यांवरील खर्च नियंत्रणाची मागणी- ॲड. वैभव मोरे; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन
पुढील बातमी
देविका मंगल कार्यालयाजवळ अपघातप्रकरणी बुलेट चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या