धर्म, अर्थ, काम, मोक्ष, प्रीती, कीर्ती, यश, व्यवहारज्ञान,अशुभ निवारण विज्ञान, तत्वज्ञान,अशा हेतूने साहित्य लिहिल्यामुळे अनेकांनी यांना साहित्याची प्रयोजने म्हणून सांगितले असले तरी जगभरातील विविध साहित्य प्रकारातील भावनांचा परामर्श घेतला तर आपल्याला जाणवेल की यातना सहन करणारे साहित्य किंवा न्यायासाठी संघर्ष करणारे साहित्य हेच वाचनीय झालेले आहे. व्यवस्था मग ती राजेशाही असो, भांडवलशाही असो की अगदी लोकशाही, अशा विविध देशात हरेक प्रकारे मोठ्या प्रमाणात माणसांचे दमन केले जाते, मानवी हक्क नाकारले जातात, सत्तेपासून वंचित ठेवले जाते, धर्म, पंथ, लिंग,वंश,जात, प्रदेश यावरून भेदभाव करून न्याय हक्कापासून वंचित ठेवले जाते.
विविध देशात हरेक प्रकारे मोठ्या प्रमाणात माणसांचे दमन
अज्ञानाचे गैरफायदे कावेबाज लोक घेत असतात, फसवणूक करत असतात, एक प्रकारची अदृश्य गुलामगिरी चालू असते. मोठ्या प्रमाणात काम करून घेऊन, त्याचे दाम मात्र तुटपुंजे दिले जाते, वेठबिगारी ,महिलांचे शोषण ,दलित म्हणून उपहास उपेक्षा ,बहुसंख्याकांचे अल्प संख्याक यावर होणारे हल्ले, जमीन,जंगल, जल या पासून वंचित ठेवणे,मानवी कल्याणाच्या न्याय योजनांचे वाटोळे करून तो पैसा स्वतः आपण खाणे, प्रलोभने दाखवून मते खाणे ,बेकायदेशीर कामे करणे ,अतिक्रमण करणे, महिलांवर अत्याचार करणे, लहान मुलांचे श्रम व लैंगिक शोषण करणे, इतर राष्ट्र जिलेबी खाल्ल्यासारखी खाणे, इतरांची सार्वभौमता धोक्यात आणणे ,हे प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहेत. बुवाबाजीतून फसवणूक करून शोषण,आर्थिक शोषण, श्रम शोषण, बुद्धीचे शोषण, धाकाने अगर प्रलोभनाने शरीर अवयव विकायला भाग पाडणे, निवडणुकीत दुसरा उमेदवार उभा राहणार नाही यासाठी अत्याचार करणे, सरकारी कार्यालयात तसेच जीवनात भ्रष्टाचार करून शोषण करणे, शिक्षणाचा देखावा करून योग्य शिक्षण न देता इतरांचा पैसा लुबाडणे, हवाला करणे, अब्रू विकायला भाग पाडणे, गावात जातीची लोकसंख्या जास्त म्हणून ओढे खाणे, वाळू, मुरूम पळवणे, जंगलातील संपत्ती पळवून, आदिवासींना हाकलून लावणे, छोट्या देशांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणे, धर्माचे नाव घेऊन लोकांना नशिले बनवणे ,लोकांना व्यसनी बनवून लोकांच्या हक्कावर गदा आणणे , सरकारी योजनात अपहार करणे, इतरांच्या हद्दीत जाऊन जमीन बळकावणे, रात्रीत पुतळे उभे करून कायदे मोडणे, आपली सरंजामी कायम राहिली पाहिजे यासाठी गुंडाकडून लोकावर अत्याचार करणे, दह्शत निर्माण करणे.
समाज सुधारकांचे खून पाडून लोकांचा आवाज दाबणे
समाज सुधारकांचे खून पाडून लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे, लोक अंधश्रद्धेत राहावेत म्हणून संघटीत संघ स्थापन करून देशादेशात लोकांना अभिनिवेशी बनवणे व वैर निर्माण करणे, दंगली घडवून आणणे ,सरकारी कर चुकविणे , सार्वजनिक संपत्तीचा ताबा बलाने घेणे ,लोकांची कामाची कंत्राटे घेऊन काम योग्य रित्या न करणे ,साहित्यिक टोळ्या तयार करून निपक्षपाती कार्य म्हणून पुरस्कार वाटून घेणे ,सेवा जेष्ठता डावलून पदे हापूस आंबा चोखतात तशी चोखत राहणे दुसर्यांच्या बदल्या झाल्या तरी चालतील पण माझी करू नका, म्हणून व्यवस्थेशी लांगुलचालन करून फायदे उपताने ,इतरांचा विश्वास घात करणे , सामान्य नागरिक, मुले ,स्त्रिया यांचे हाल करणे, युद्ध लादणे, दंगली घडवून आणणे, लोकांचे मेंदू सत्य गोष्टी समोर येऊ नयेत म्हणून माध्यमात विविध प्रलोभने कार्यक्रम करणे ,वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग करणे ,इतर कंपन्यांना आपल्या अभिरुची कळवून, उत्पादक यांचेकडून फायदे लाटणे, शेतकरी यांच्या उत्पन्नास योग्य भाव न देणे , लोक कल्याणासाठीचा पैसा भ्रष्टाचार करून पळवणे, फेक न्यूज प्रसारित करून माणसे बहकतील असे वातावरण तयार करणे, माध्यमात सत्य येणार नाही म्हणून पत्रकार व मध्यम प्रतिनिधी यांच्यावर दबाव टाकणे, न्यायाधीशांना धमकावणे, डिजिटल शोषण करणे ,शारीरिक व मानसिक छळ करणे, स्त्रिया मुले यांना नोकरीचे आमिष देऊन त्यांना प्रलोभने दाखवून बलात्कार करणे ,एप सतीन ने केलेल्या, खोटी औषधे देणे ,संमोहित करून आर्थिक लाभ घेणे, कला बाजार करणे, व्यसनी पदार्थ विक्री करून मानवी साधने बरबाद करणे ,पैसे वाटप करून मत घेणे , अपहरण करणे, विरोध करतो त्यास हालहाल करून मारणे, शस्त्राचा धाक दाखवून चोरी करणे, स्त्रियांना दुय्यम स्थान देणे, अफवा व खोटी माहिती देऊन चांगल्या व्यक्तीस बदनाम करणे.
कितीतरी प्रकार शोषणाचे आपल्याला सांगता येतील
तृतीय पंथीय यावर अत्याचार करणे, गुलाम लोक राहतील याची काळजी घेणे, कामगारांच्या श्रमाचे शोषण , घरगुती हिंसाचार ,दैववादाचा प्रसार करणे, देवाचे नाव घेऊन लुबाडणूक करणे, सावकारी शोषण ,असंघटीत मजूर यांना कमी पगार ,हॉटेल वीत भत्त्यात लहान मुलांचा वापर, ओंलैन फसवणूक, डोनेशन, आरोग्याचे शोषण, जातपंचायतीकडून होणारे अत्याचार, विस्थापितांचेवर अन्याय, देशातच प्रादेशिक वाद उकरून माणसाला द्वेषाची शिकार करणे. आदिवासी शोषण , भाषिक प्रतिष्ठेच्या नावाखाली भाषेला तुच्छ लेखणे, विकास निधीतील विषमता, लोक कलाकार यांना अल्प मानधन ,समान वेतन अभाव, गर्भलिंग चाचणी ,पोलिसी दडपशाही, तृतीय पंथीय म्हणून असमान वागणूक, पाणी टंचाई निर्माण सार्वजनिक शिधा पळवणे, प्रवाशांचे शोषण, इंटरनेट सर्वस न मिळणे. कार्पोरेटमध्ये टार्गेट पुरती साठी कर्मचारी यांचे शोषण, भेसळयुक्त अन्न, विमा फसवणूक बेकायदेशीर वाळू उपसा आणि खानकाम, वैयक्तिक माहिती विकून कंपन्या डिजिटल शोषण करत आहेत, तासन तास स्क्रीनवर माणसे बसतील अशी सोय करून शोषण, ट्रोलिंग करून शोषण, झोमतो कामगार शोषण, ग्रीन वाशिंग, असे कितीतरी प्रकार शोषणाचे आपल्याला सांगता येतील.
जगात शोषण होत नाही अशी कोणती जागा आहे हा प्रश्न आपल्याला पडतो. मग हे अधिक अधिक विषय असतील तर त्या त्रासातून ,वेदनेतून साहित्य निर्माण होते. जगण्यात निर्माण करण्यात आलेल्या बाह्य व आंतरिक समस्या यात शोषणाचा भाग अधिक आहे. म्हणूनच साहित्यात शोषितांचा आवाज जास्त येतो,आणि ते दुःख ,वेदना आणि शोषणाविरूद्धचा संघर्ष सर्व जगभरातील साहित्याचा विषय आहे.स्वनिर्मित्त दुःखे जशी आहेत ,तशी तृष्णेमुळे अनैतिक मार्गाने धन मिळविणे व अत्याचार करणे या प्रकारामुळे दुःखे जास्त आहे.
शोषणाचे मूळ हे सत्तेच्या असमान वाटपात
दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्ती संघर्ष हाच साहित्याचा केंद्रबिंदु आहे. मग साहित्य या प्रकारचे साहित्य वाचल्याने अगर अभ्यास केल्याने तरी असा काय फायदा होतो ? . साहित्यात शोषणाचा शोध घेणे ही केवळ एक वाङ्मयीन प्रक्रिया नसून ती मानवी अस्तित्वाचा आणि संघर्षाचा शोध आहे.साहित्यातून दबलेल्या, उपेक्षित आणि शोषित घटकांचा तो आवाज समोर येतो, साहित्य जेव्हा शोषणाचे स्वरूप उघड करते, तेव्हा ते वाचकाला नैतिकदृष्ट्या जागृत करून स्वातंत्र्य, समता आणि मानवी हक्क या मूल्यांची निकड अधोरेखित करते ज्यामुळे जागतिक स्तरावर एक भावनिक साखळी निर्माण होते .प्रेरणा: शोषितांचे साहित्य वाचल्यामुळे इतर शोषित समूहांना अन्यायाविरुद्ध संघटित होऊन आवाज उठवण्यासाठी प्रेरणा मिळते.साहित्यातून मांडल्या जाणाऱ्या शोषणाच्या प्रश्नांमुळे मानवाधिकार संघटना आणि सरकारांना आपल्या धोरणांमध्ये बदल करण्यास भाग पाडले जाते. आधुनिक युगात शोषणाचे. युद्ध आणि विस्थापन होते तेंव्हा कोण कुणाचे शोषण का करते हे कळते रशिया-युक्रेन किंवा इस्रायल-गाझा युद्धासारख्या घटनांमध्ये सामान्य नागरिक आणि महिलांचे प्रचंड शोषण होत आहे. अनेक देशांमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कारखान्यांमध्ये कमी पगारात कामगारांकडून काम करून घेतले जाते, ज्याचे विदारक रूप बालमजुरीत दिसते. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वैयक्तिक डेटाचा वापर करून कंपन्या नफा कमवत आहेत, तर 'सायबर बुलिंग'मुळे लोकांचे मानसिक शोषण होत आहे.विकसित देशांच्या चंगळवादामुळे होणारा हवामान बदल गरीब देशांतील जनतेवर अन्यायकारक ठरत आहे. शोषणाची प्रक्रिया ही अत्यंत गुंतागुंतीची आणि बहुआयामी असते. समाजात शोषण हे केवळ शारीरिक बळाचा वापर करून होत नाही, तर ते मानसिक, आर्थिक आणि व्यवस्थात्मक पातळीवर अत्यंत सूक्ष्मपणे घडवून आणले जाते. शोषणाचे मूळ हे सत्तेच्या असमान वाटपात असते.
पूर्वसंचिताच्या नावाखाली अन्यायाचे समर्थन
मानसिक आणि सांस्कृतिक गुलामगिरी आहे केवळ शरीराला गुलाम बनवून शोषण पूर्ण होत नाही. शोषक व्यवस्था किंवा पूर्वसंचिताच्या नावाखाली अन्यायाचे समर्थन केले जाते. गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून देण्यासाठी आणि आयुष्यातले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी शोषितांच्या शोषणाचा अभ्यास उपयुक्त ठरतो. स्त्रियांना विशिष्ट अधिकार नाकारणे किंवा विशिष्ट जातींना शिक्षणापासून दूर ठेवणे. इंटरनेट आणि डेटाच्या माध्यमातून लोकांच्या सवयींवर नियंत्रण मिळवणे, जाहिरातींच्या माध्यमातून अनावश्यक गरजा निर्माण करणे आणि मानवी भावनेचा वापर नफ्यासाठी करणे हे शोषणाचे आधुनिक प्रकार आहेत. जगात म्हणूनच जागरूक व्यक्तींनी शोषणाची मुळे शोधून काढली आणि उपाय सुचविले,चळवळी करून शोषकांचे चेहरे जगासमोर आणले, हे युद्ध वैचारिक आणि कधी कधी हिंसक झाले आहे. आपल्या देशात देखील शोषणाच्या इतक्या घटना घडत असताना आपण आंधळे झालेले आहोत .आपण निवडून दिलेले प्रतिनिधी लोकसेवक न बनता सरंजामदार झाल्यासारखे राहत असतील ,आणि निवडणुकीत गैरप्रकार करत असतील, हिंसा ,द्वेष परत असतील ,लोकशाही ज्यावर चालते त्या संविधानाला किंमत न देता गुंडगिरी करत असतील.आणि धर्मांधता पसरवत असतील,लैन्घिक शोषण करत असतील, बुवाबाजीद्वारे अंधश्रद्धा फैलाव करण्यास उत्तेजन देत असतील. कायदे सरळ असताना ते खुले आम तोडत असतील तर असे जे कुणी असतील ते शोषक आहेत हे स्पष्ट होते. जमीन, जल,निसर्ग संपत्ती, देशातील विविध मानवी साधने आपल्या अंकित राहतील आणि त्यासाठी मी काहीही करीन असे वर्तन कोणी करत असेल तर ते शोषण आहे.
वेदना म्हणजे निव्वळ कळवळणे नव्हे ती विद्रोहासाठीची हाक
केवळ लोकप्रतिनिधीच नव्हे देशाच्या कायद्याच्या व्यवस्थेची फसवणूक करणारे, आपण ज्या क्षेत्रात काम करतो ते नियम व्यवस्थित न पाळणारे ,सामाजिक न्याय न देता मनमानी करणारे देशातील शांतता आणि सुव्यवस्था याला बाधा आणणारे, नागरिकांच्या विविध प्रकारच्या संविधानिक अधिकारावर अत्याचार करणारे हे जे कोणी आहेत ,ते मतलबी आणि शोषक आहेत. म्हणूनच जगात वेगवेगळ्या देशात जेंव्हा विविध मार्गांनी शोषण होत असते, तेंव्हा शोषकांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत हे दिसू लागते. सत्ता ,किंवा शोषक संस्था साव असल्याचा आव आणते पण गुपचूप बेकायदेशीर कृत्य करून आपला स्वार्थ साधते ,शोषण करते. साहित्य लिहिणारे लोक कधी या प्रवृतीला उघड करतात ,तर कधी साहित्य लिहून प्रवृतीला विरोध प्रकट करतात ,खरे तर हा त्यांचा विरोध साहित्यात प्रकट होतोय का ? कि ते दुर्लक्ष करून बसलेत हे साहित्यातील त्यांच्या संवेदनेतून कळत असते. प्रतिमा,प्रतीके ,कल्पना ,आणि मूल्य विचार याचा शोध घेता कलाकृती कशासाठी जन्मास आल्या हे कळत असते. म्हणून आपण नागरिक असा,विद्यार्थी ,शिक्षक ,कुणीही असा शोषण दर्शन जे साहित्य घडवीत असते ते आपल्याला विचार करायला लावते, त्या वर्णनाची धग समजून घेऊन ,विचार समजून घेऊन शहाणे होत आपण अंतर्मुख होऊन चुकीच्या गोष्टीला विरोध करायचा असतो. अन्याय खपवून घ्यायचा नसतो. म्हणूनच शोषण साहित्याच्या वेदना तुमच्याशी बोलत असतात. त्या नकली कि खऱ्या हे देखील पाहून आपण समाजाच्या हिताला आणि सामाजिक न्यायाला पाठिंबा द्यायचाच पण विधायक कृतीने पाप नष्ट करून हितकारक कामे करायची असतात. म्हणूनच जगातले सर्व महत्वाचे प्रश्न शोषण दर्शन घडविणाऱ्या साहित्यात असतात ,असे साहित्य वाचून जग बदलण्यासाठी आपले योगदान करणे यातच बहुजन हित असते. वेदना म्हणजे निव्वळ कळवळणे नव्हे विद्रोहासाठीची ती हाक असते .