महाविद्यालयाच्या आवारातून विद्यार्थिनीचे अपहरण

by Team Satara Today | published on : 19 August 2025


कराड : तालुक्यातील एका विद्यार्थिनीचे महाविद्यालयाच्या आवारातूनच अपहरण करण्यात आले. याप्रकरणी संबंधित महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने कराड पोलिसांना माहिती दिली असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून विद्यार्थिनीचा शोध घेतला जात होता.

तालुक्यात एका महाविद्यालयात परजिल्ह्यातील एक विद्यार्थिनी मागील काही महिन्यांपासून शिक्षण घेत आहे. सोमवारी दुपारी लेक्चर संपल्यानंतर संबंधित युवती मैत्रिणींसोबत महाविद्यालयाच्या आवारातील होस्टेलच्या दिशेने जात होती. त्याचवेळी तिघा युवकांनी तिला एका कारमध्ये बसवून कराड-विटा मार्गाच्या दिशेने नेले. हा प्रकार तिच्या मैत्रिणींनी प्राचार्य तसेच व्यवस्थापनातील अन्य अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्राचार्यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून संबंधित युवतीचा शोध सुरू होता. युवतीचा शोध लागल्यानंतर तिच्या जबाबावरूनच त्याप्रमाणे गुन्हा दाखल होणार आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात ‘मतचोरी’ विरोधात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम
पुढील बातमी
सासुर्वेत हुतात्मा प्रवीण वायदंडेंना निरोप

संबंधित बातम्या