04:43pm | Sep 19, 2024 |
पुणे : पुणे शहरात सार्वजनिक वाहतूक ही केवळ पीएमपीएमएल वरच अवलंबून होती. पुणे शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुण्यात मेट्रो उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन मेट्रो मार्गाचे लोकार्पण केले होते. दरम्यान सुरूवातीच्या काळात पुणेकरांचा मेट्रो अल्प प्रतिसाद पाहायला मिळाला. त्यानंतर हळू हळू मेट्रोचा प्रवास मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला. गणेशोत्सवात पुणेकरांनी मेट्रोचा भरपूर वापर केला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे मेट्रोने एक नवीन विक्रम रचला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात पुणे मेट्रोने एक नवीन विक्रम रचला आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी एकाच दिवसांत तब्बल साडे तीन लाख पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला आहे. मेट्रोच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीला विशेष महत्व आहे. ही मिरवणूक पाहण्यासाठी लाखो पुणेकर आले होते. या वेळेस अनेक रस्ते वैगरे बंद असल्याने पुणेकरांनी मेट्रोला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. विसर्जनाच्या दिवशी तब्बल तीन लाख ४६ हजार ६३३ प्रवाशानी प्रवास केला आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी साडे तीन लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी मेट्रोने प्रवास केल्याने पुणे मेट्रोला ५४ लाख ९२ हजार ४१२ रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या कालावधीत ६ लाखांपेक्षा जास्त पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला आहे. त्यामुळे पुणे मेट्रोला ३ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न प्राप्त झाले आहे. ७ ते १७ सप्टेंबरपर्यंत पुणे मट्रोने मध्यरात्रीपर्यंत सेवा दिली, तर १७ आणि १८ तारखेला २४ तास पुणे मेट्रो सुरू होती.
येत्या २७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळेस सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्वारगेट ते शिवाजीनगर या मेट्रोचे मार्गाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. हा संपूर्ण मार्ग भुयारी असणार आहे. केंद्र सरकारने स्वारगेट ते कात्रज मेट्रोच्या मार्गाला देखील मान्यता दिली आहे. पुण्यातील एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त होत आहे.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |