सातारा : वनवासवाडी, ता. सातारा येथून एका अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फुस लावून पळवून नेले. ही घटना दि. १६ रोजी पहाटे ३.३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी वडिलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक केणेकर तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत दि. १५ रोजी दुपारी १.१५ ते २.३० च्या दरम्यान खणआळी येथे खरेदीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फुस लावून पळवून नेले. या प्रकरणी मंगळवार पेठेतील महिलेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक गुरव तपास करत आहेत.