रिपब्लिकन सेनेचा साताऱ्यात आत्मदहनाचा इशारा; विविध मागण्यांसाठी प्रशासनाविरोधात आंदोलन तीव्र

by Team Satara Today | published on : 08 July 2026


सातारा  : साताऱ्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या सातव्या दिवशी रिपब्लिकन सेनेने प्रशासनाविरोधात अनोखे आंदोलन करत संताप व्यक्त केला. तारेवरची कसरत करून जमा केलेले पैसे भ्रष्ट अधिकाऱ्यांना देऊन त्यांच्या विरोधात निषेध नोंदविण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश उबाळे यांनी सांगितले की, सात दिवसांपासून विविध प्रकारची आंदोलने करूनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही. "भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांच्या पगारात भागत नसल्यामुळे आम्ही तारेवरची कसरत करून जमा केलेले पैसे त्यांना देणार आहोत," असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

तसेच, ९ जुलै रोजी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे आणि महिला जिल्हाध्यक्ष पूजा बनसोडे आत्मदहन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. सात दिवस उपोषण करूनही प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आवाहन करत उबाळे म्हणाले, "आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नसेल आणि अशी वेळ आमच्यावर आलीच, तर उद्या काही अनुचित घटना घडल्यास आमच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून साताऱ्यात यावे."

दरम्यान, आंदोलनकर्त्यांच्या या इशाऱ्यामुळे प्रशासनाची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला मुसळधार पावसाचा मोठा फटका; भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे; पाणीपुरवठा विस्कळीत
पुढील बातमी
कोरोना काळात सर्व्हे करण्याच्या बहाण्याने टाकणाऱ्या आरोपींना तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा

संबंधित बातम्या