अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा : अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकावर कारवाई करत सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील बसप्पा पेठ, करंजे, सातारा येथे गणेश चंद्रकांत ढोकळे रा. रविवार पेठ, सातारा हे अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून पाच लाख 53 हजार 960 रुपये किंमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या आणि एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली आहे.


मागील बातमी
सातारा शहरातील तीन चक्री जुगार अड्ड्यांवर कारवाया
पुढील बातमी
महामार्गावरून दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या