कुडाळ येथे गणपती मिरवणुकीत बीम लाईटचा वापर; दोन मंडळांवर गुन्हे दाखल

by Team Satara Today | published on : 16 September 2026


कुडाळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे गणपती आगमन मिरवणुकीत बीम लाईटचा वापर केल्याप्रकरणी मेढा पोलिसांनी दोन गणेश मंडळांवर स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिस अधीक्षक, सातारा यांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी लेझर व बीम लाईटच्या वापरावर बंदी घातली आहे. तसेच मेढा पोलिसांकडून संबंधित गणेश मंडळांना बीम लाईटचा वापर करू नये, अशा सूचना दिल्या होत्या. त्यावरूनच मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील व कुडाळ पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार निकम यांनी याबाबत बंदोबस्तामध्ये सदर मिरवणुकीत डीजे आणि लेसर लाईट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्काळ कारवाई केली आणि संबंधित डीजेच्या गाड्या देखील जप्त केल्या.
१४ सप्टेंबर रोजी रात्री कुडाळ बाजारपेठ ते पीयूष चौक या मार्गावर गणपती आगमन मिरवणूक सुरू असताना बीम लाईटचा वापर होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी श्री गणेश मित्र मंडळ, कुडाळ आणि राजमुद्रा गणेश मंडळ, कुडाळ या दोन मंडळांवर कारवाई करण्यात आली. श्री गणेश मित्र मंडळाच्या प्रकरणात विरा लाईटस्‌, पुसेगावचे तेजस भिमराव येवले यांच्याविरुद्ध, तर राजमुद्रा गणेश मंडळप्रकरणी ए. एस. लाईटस्‌, पुसेगावचे निहाल नवनाथ लेंबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रशासनाने काम असे करावे की, नागरिकांना जनता दरबारात तक्रार करण्याची वेळच येऊ नये - रणजितसिंह निंबाळकर, फलटण येथे जनता दरबाराला नागरिकांचा प्रतिसाद
पुढील बातमी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आयोगाचा निर्णय योग्य असल्याचा जोरदार युक्तिवाद; निकालाकडे दोन्ही गटांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष

संबंधित बातम्या