03:17pm | Oct 02, 2024 |
माणूस हा आयुष्यभर कशा ना कशाच्या शोधात असतो. बरेचदा हे शोध आपणच कल्पलेल्या जादुई स्वप्नांचे असतात तर काही आत्मशोधासाठी असतात. बरेचदा हे शोध साधे-सरळ, तर काही वेळा असामान्य, अगम्य असतात पण हे शोध सुरुचं असतात. असेच काहीसे एका रात्रीतील गुढ लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. हो कारण स्वप्नांच्या शोधाच उलगडणारं रहस्य हे ‘गारुड’ या चित्रपटातून २५ ऑक्टोबरपासून मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज होत आहे.
स्वप्नांच्या दुनियेत वावरत असताना एखाद्या शोधात ही पात्रे कशी गुरफटत जातात, आणि शेवटी तो शोध ते घेऊ शकतात का?, याचे गुपित या गारुड या चित्रपटातून उलगडणार आहे. “अंधारल्या रातीचं गारुड, भिजलेल्या रातीचं गारुड”, असं म्हणत काळोखातील प्रकाशाच्या शोधातील हे ‘गारुड’ चित्रपटाचे मोशन पोस्टर अधिकच उत्सुकता वाढवत आहे.
‘किमयागार फिल्म्स’, ‘एल एल पी’ आणि ‘ड्रीमव्हीवर’ निर्मित आणि ‘सनशाईन स्टुडिओ’ प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा ध्रुव दास, तृप्ती संजय राऊत, श्वेता देवेंद्र गुजर-शाह यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तसेच सह निर्माते म्हणून स्मृती प्रमोद खाडिलकर, अमोल चंद्रशेखर परांजपे, श्रुती ओंकार संगोरम यांनी बाजू सांभाळली. तर दिग्दर्शक प्रताप विठ्ठलराव सोनाळे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे.
तर चित्रपटाची कथा डॉ. प्रमोद खाडिलकर लिखित आहे. तर रहस्यमय अशा लक्षवेधी संगीताची जबाबदारी ओंकार संगोरम यांनी संभाळली आहे. चित्रपटाबाबत दिग्दर्शक प्रताप सोनाळे यांनी असं म्हटलं की,”हा एक काल्पनिक चित्रपट आहे. पण मग यात विशेष असे काय आहे तर याची हाताळणी. ही हाताळणी आपल्या आजच्या वास्तविकतेशी मिळतीजुळती आहे, यातील प्रत्येक गूढ पात्र इतर पात्रांसोबत होणाऱ्या देवाणघेवाणीतून उलगडत जातं. त्यातूनच त्यांच्या कथेच्या, त्यांच्या शोधाच्या आवृत्त्या सादर होतात, पण ते शोध प्रेक्षकांच्या समोर येतात एका रंजक, गूढ, रहस्यमयी वेशात. त्याचं ‘गारूड’ आपल्या संवेदनांवर पकड घेतंच पण आपल्या मेंदूवरही आणि एक वास्तवकथाच पाहील्याची अनुभूती मिळते”, असं म्हणत त्यांनी सुंदर अशा रहस्यमय कथेची ओळख करुन दिली आहे. गारुड हा रहस्यमय चित्रपट येत्या २५ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |