सातारा : सातारा शहरातील तामजाई नगर येथे अज्ञात चोरट्यांनी 63 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 ते 26 दरम्यान प्रकाश नारायण शिंदे रा. तामजाई नगर, सातारा यांच्या बंगल्याच्या बैठक खोलीच्या खिडकीचे गज कशाने तरी कापून अज्ञात चोरट्यांनी घरातील 63 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि चांदीचा तांब्या चोरून नेला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार वरे करीत आहेत.