जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण, समाज कल्याण व विषय समित्यांच्या सभापदीपदांची निवड संपन्न

by Team Satara Today | published on : 04 April 2026


सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण, महिला व बालकल्याण आणि इतर दोन विषय समित्यांच्या सभापती पदासाठी ४ एप्रिल २०२६ रोजी दुसरी विशेष सभा आयोजित करण्यात आली. यामध्ये चार नामनिर्देशनपत्र दाखल झाली. छाननी अंती कोणाताही अक्षेप नसल्याने चारही नामनिर्देशनपत्रे स्वीकृत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जाहीर केले.

यामध्ये ऋतुजा विराज शिंदे यांनी महिला व बाल कल्याण सभापती पदासाठी, ऋषीकेश धायगुडे-पाटील यांनी समाज कल्याण समिती सभापती पदासाठी, लता अविनाश कर्णे आणि तेजस्विनी विक्रमशिल कदम यांनी विषय समिती सभापदी पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केली होती. चारही नामनिर्देशन पत्रे प्रत्येक पदासाठी प्रत्येकी एक नामनिर्देशनपत्र आल्याने या चार जणांची निवड करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी घोषीत केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, तहसीलदार समीर यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले आदी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सह्याद्रीच्या कुशीत रंगलेला ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’ पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन
पुढील बातमी
भाजप आदिवासी मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत संघटन बळकटीवर भर; प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळींचे नेतृत्व कौतुकास्पद – रवींद्र चव्हाण

संबंधित बातम्या