सातारा : सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचे अज्ञातांनी अपहरण केल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर व सातारा तालुका परिसरातून 17 वर्षीय दोन अल्पवयीन मुलींचे अज्ञाताने अपहरण केले. ही घटना दि. 7 जुलै रोजी घडली असून सातारा शहर व सातारा तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.