03:25pm | Jan 08, 2025 |
सातारा : महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अन्वये बालगृहे कार्यरत असून या बालगृहात अनाथ, निराधार, उन्मार्गी, विधी संघर्षग्ररूस्त मुले/मुली दाखल आहेत. दाखल प्रवेशितांचे अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळण्याचे दृष्टीने सातारा जिल्हयातील बालगृहात दाखल असलेल्या व इतर विदयालयातील प्रवेशितांच्या जिल्हास्तरावरील चाचा नेहरू बालमहोत्सवाअंतर्गतच्या क्रीडा स्पर्धांचे 9 ते 11 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांनी दिली आहे.
जिल्हास्तरावरील चाचा नेहरू बालमहोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या शुभहस्ते 9 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, 100 मिटर धावणे, रिले, गोळाफेक, थाळी फेक, लिंबू चमचा, संगित खुर्ची, उंच उडी, लांब उडी, इत्यादी क्रिडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. बौध्दिक स्पर्धांमध्ये बुध्दीबळ, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, समूह गीते या स्पर्धा होणार आहेत. चाचा नेहरू बाल महोत्सवामध्ये विजेता ठरलेल्या विजयी व उपविजयी संघाना शिल्ड, ट्रॉफी, स्पर्धकांना प्रमाणपत्र व मेडल देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी बालकांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.
या बालमहोत्सवाचा समारोप 11 जानेवारी रोजी होणार असून या कार्यक्रमासही जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख हे मान्यवर उपस्थित राहून मुलां-मुलींना मार्गदर्शन करणार आहेत.
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |

एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
आर.टी.ई अंतर्गत राज्यातील इंग्रजी स्कूलचे २४०० कोटी थकले |