ओबीसी महामंडळाच्या थकीत व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्याऱ्या एकरक्कमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 29 October 2026


सातारा :  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणा-या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा  योजना दि.३१ मार्च २०२७ पर्यत राबविण्यात येत आहे. त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीनी सदर योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या सातारा जिल्हा कार्यालयाशी (दूरध्वनी क्रमांक ०२१६२-२९५१८४) संबधितांनी संपर्क साधावा असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन
पुढील बातमी
ओगलेवाडी व परिसरातील शेतकऱ्यांचे ऊसाच्या दरासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन; आंदोलनस्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

संबंधित बातम्या