मुंबईत कोस्टल रोडवरील पुलावर भरधाव बीएमडब्ल्यू कारला भीषण अपघात; तीन तरुण जागीच ठार, एक गंभीर जखमी

by Team Satara Today | published on : 20 September 2026


मुंबई : कोस्टल रोडवरील पुलावर भरधाव वेगाने जाणारी बीएमडब्ल्यू कार अपघातग्रस्त होऊन खाली कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना आज (दि.२०) पहाटे  घडली. प्राथमिक तपासानुसार, अतिवेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले हा भीषण अपघात झाला. मृत तिघेही बीएमडब्ल्यू (BMW) कारमध्ये होते.
कोस्टल रोड कंट्रोल रूमने दिलेल्या माहितीनुसार, मरीन ड्राईव्हकडून हाजी अलीच्या दिशेने पहाटे ५:२० च्या सुमारास काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार जात होती. अचानक कार पुलावरून खाली कोसळली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर २० वर्षांचा तरुण जखमी आहे. त्‍याला नायर रुग्णालयाच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दोन मृतांची ओळख पटली
नायर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये शनाय गज्जल (वय २१) आणि धिर्य सेठ (वय १७) यांची ओळख पटली आहे, तर एका अनोळखी २५ वर्षीय तरुणाला रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आले; एका २० वर्षीय अनोळखी तरुणाची प्रकृती गंभीर असून तो ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार घेत आहे. आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'छात्रों की गूंज' कार्यक्रमावरून वाद; मोदींची नक्कल केल्याप्रकरणी भाजपचा राहुल गांधींवर हल्‍लाबोल, भाजप -काँग्रेसमध्‍ये आरोप प्रत्‍यारोप
पुढील बातमी
एकल महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य शासन नवीन धोरण राबविणार; राज्यात ५४ लाख एकल महिलांची प्राथमिक नोंद

संबंधित बातम्या