जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली; साताऱ्यातून शुभारंभ; उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर जोरदार टीका

by Team Satara Today | published on : 27 January 2026


सातारा : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच १२ जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली असून त्यांचा शुभारंभ आज सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथे घेतलेल्या प्रचार सभेद्वारे करण्यात आला आहे.

या झंझावाती प्रचार दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदे हे २८ जानेवारी रोजी परभणी, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यात, तर २९ जानेवारी रोजी सोलापूर धाराशिव येथे, तर ३० जानेवारी रोजी पुणे सांगली जिल्ह्यात, ३१ जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यात, १ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात तर २ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी नगर आणि रायगड रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेवारासाठी प्रचारसभा घेणार आहेत. निवडणुका म्हटले की शिंदे प्रचारात कोणतीही कसूर ठेवत नाहीत त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा या प्रचार दौऱ्याच्या दरम्यान आल्याशिवाय राहणार नाही.

आज झालेल्या सभेत त्यांनी, सामान्य जनतेसाठी कामे न करता केवळ टीका करत राहिल्यामुळे जनतेने त्यांना घरी बसवले आहे. जनता नेहमी विकास करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहते असा थेट आणि आक्रमक हल्लाबोल करत उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले.

भावनिक ब्लॅकमेल करून सत्ता मिळत नाही

नुसते "भावनिक ब्लॅकमेल करून सत्ता मिळत नाही. विकास करावा लागतो. रस्ते, पाणी, रोजगार, आरोग्य, शिक्षण, उद्योग, पर्यटन हेच शिवसेनेचे अजेंडा आहे. कोर्टात जा, स्थगिती आणा, प्रकल्प रोखा, सण-उत्सव बंद करा, मंदिर बंद करा, मेट्रो, समृद्धी महामार्ग, कारशेड, विकास प्रकल्पांवर स्पीड ब्रेकर लावा हेच त्यांचे काम. आम्ही मात्र ते स्पीड ब्रेकर हटवून महाराष्ट्राला गती दिल्याचे सांगितले.


महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच महायुतीला 232 जागा मिळाल्या. शिवसेना विधानसभेत, नगरपालिका, नगरपरिषद, महापालिका निवडणुकांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरली. चांदा ते बांदा शिवसेना पोहोचली आहे. जे रोज टीका करतात, ते आता पाचव्या-सहाव्या क्रमांकावर गेले असल्याचे सांगत त्यांनी आपल्या सभेतून उबाठा गटाचा समाचार घेतला.


महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकावर आणल्यानंतर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत देखील पक्षाचा हाच दबदबा कायम राखण्यासाठी शिंदे मैदनात उतरले असून, येत्या आठवडाभर आपल्या प्रचार सभांनी ते महाराष्ट्र पिंजून काढत पुन्हा एकदा पक्षाची यशस्वी घडदौड कायम राखण्यासाठी ते पूर्ण ताकतीने मैदानात उतरले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहूपुरी हद्दीत गणेश कॉलनी येथे महिलेचे मंगळसूत्र लांबवले.
पुढील बातमी
लाडकी बहीण' योजना कुणीही बंद पाडू शकत नाही; बोंडारवाडी धरण पूर्ण करणारच : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केळघरमध्ये गर्जना

संबंधित बातम्या