मेढा : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव व कौस्तुुभ गावडे हे पदवीधर आणि शिक्षक बांधवांच्या प्रश्नांना योग्य न्याय देतील. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे रहा, असे आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे वॉर रूमप्रमुख राम चिकणे यांनी केले. दरम्यान, जावलीतून उच्चांकी मतदान होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मेढा येथील महात्मा गांधी वाचनालयात पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील भाजप-महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रमुख कार्यकर्ते व मतदारांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रुपाली वारागडे, उपनगराध्यक्ष देशपांडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देशपांडे, भाजपचे जावली पश्चिम मंडलाध्यक्ष मारुती चिकणे, पत्रकार भास्कर धनावडे, रघुनाथ दळवी, नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी तसेच पदवीधर व शिक्षक मतदार उपस्थित होते.
जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे म्हणाले, पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांना जावली तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी कार्यकर्त्यांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून मतदानासाठी त्यांना प्रवृत्त करावे. प्रास्ताविक नगरसेवक शिवाजी गोरे यांनी केले, तर आभार शिवाजीराव देशमुख यांनी मानले.
विजयात जावलीचे मोठे योगदान राहणार : मानकुमरे
ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांनी डॉ. स्मिता योगेश जाधव यांना जावली तालुक्यातून भरघोस मतदान होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, डॉ. स्मिता जाधव यांच्यासाठी ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी अधिकाधिक मतदान होण्याच्यादृष्टीने सूचना केल्या आहेत. त्यानुसार कार्यकर्ते व पदाधिकारी झपाटून काम करत आहेत. डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयात जावलीचे चांगले योगदान राहिल, असा विश्वासही मानकुमरेंनी व्यक्त केला.
डाॅ. स्मिता जाधव यांना जावली तालुक्यातून उच्चांकी मतदान होणार - राम चिकणे, भाजप-महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ मेढा येथे बैठक
by Team Satara Today | published on : 22 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा