अपशिंगे येथून 11 लाख रुपये किमतीच्या पिकअपची चोरी; बोरगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 29 September 2026


सातारा : अपशिंगे परिसरातून सुमारे 11 लाख रुपये किमतीची महिंद्रा कंपनीची पांढर्‍या रंगाची पिकअप अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अनिकेत रमेश नलवडे (वय 26, व्यवसाय-ड्रायव्हर, रा. विनोद कॉलनी, अपशिंगे, ता. जि. सातारा, मूळ रा. बोरगाव, ता. जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.
दि.21 रोजी पहाटे साडेचार वाजल्यापासून दि .22 रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या मालकीची 11 लाख रुपये किमतीची महिंद्रा कंपनीची पांढर्‍या रंगाची पिकअप (क्र. एमएच 11 डीडी 6593) चोरून नेली.याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बुधवार नाका चौकात डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; डंपर चालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
सातारा हद्दीतील शिवराज चौक येथील ब्रिजवर उभ्या गाडीला मोटारसायकलची धडक; तरुण गंभीर जखमी

संबंधित बातम्या