सातारा : सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने येथील आम्ही पुस्तक प्रेमी समूह दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी आणि मावळा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ लेखिका, अनुवादक डॉ.उमा कुलकर्णी यांच्या सत्काराचे आणि प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम सातारा नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये होणार आहे.
यावेळी संयोजकांतर्फे लेखिका डॉ.उमा कुलकर्णी यांचा अमृत महोत्सवी सत्कार करण्यात येणार असून मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे डॉ. संदीप श्रोत्री आणि विनोद कुलकर्णी डॉ. उमा कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. डॉ.उमा कुलकर्णी यांनी स्व. भैरप्पा, शिवराम कारंथ आणि अनेक कन्नड लेखकांची पुस्तके मराठीमध्ये अनुवादित केली असून त्यापैकी कित्येक पुस्तकांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. साहित्य अकादमीचा अनुवादित पुस्तकांच्या विभागात पहिलाच पुरस्कार त्यांना मिळाला होता. कार्यक्रमाचा लाभ साहित्य रसिकांनी घ्यावा असे आवाहन डॉ. संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस, विनोद कुलकर्णी आणि नंदकुमार सावंत यांनी केले आहे