ॲक्सिस बँकेच्या समोर पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीच्या डिकीमधून 7 लाख 80 हजारांची रोकड चोरीस

by Team Satara Today | published on : 20 August 2026


सातारा : दुचाकीच्या डिकीमधून 7 लाख 80 हजारांची रोकड चोरुन नेल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक 17 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास प्रीती एक्झिक्युटिव्ह हॉटेल जय इमारतीमधील ॲक्सिस बँकेच्या समोर पार्किंगमध्ये लावलेल्या देवेंद्र केशवराव गायकवाड (रा. जाधववाडी, पोस्ट तासगाव, ता. सातारा) यांच्या एक्टिवा मोपेडच्या डिकीमध्ये ठेवलेली 7 लाख 80 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण; अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल
पुढील बातमी
आळूचा खड्डा परिसरातील जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांचा छापा; रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त

संबंधित बातम्या