नोकरीच्या आमिषाने लोकांची फसवणूक करणारा ठग जेरबंद

सातारा शहर डीबी पथकाची कारवाई

सातारा : नोकरीच्या आमिषाने लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ठगास जेरबंद करण्यात सातारा शहर डीबी पथकाला यश आले आहे.

राजेश उर्फ पप्पू नंदकुमार शिंदे रा. बोरगाव, ता. सातारा असे ताब्यात घेण्यात आलेल्या ठगाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2023 मध्ये एका महिलेची ओळख निर्माण करून तिला मंत्रालयात आपली ओळख आहे आणि तिथे ओळखीने आरोग्य विभागामध्ये नर्स म्हणून नोकरी लावण्यासाठी तिच्याकडून तसेच अन्य एकाकडून असे वेळोवेळी सहा लाख वीस हजार रुपये एकाने घेतले. मात्र कोणतीही नोकरी न देता व घेतलेले पैसे माघारी देण्यास टाळाटाळ केल्याने संबंधितांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

या ठगाचा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर डीबी पथक शोध घेत होते. मात्र तो गुन्हा दाखल झाल्यापासून पळून गेला होता. या ठगावर यापूर्वी देखील अशा प्रकारे फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याने व तो सराईत असल्याने सहजासहजी सापडत नव्हता. डीबी पथकाने विविध ठिकाणी त्याचा शोध घेऊन गोपनीय माहिती प्राप्त करून त्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने संबंधित गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच आपली कोठेही मंत्रालयात व आरोग्य विभागामध्ये ओळख नसून लोकांना बोलण्यातून भुरळ पडून सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे त्याने सांगितले.

या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश यादव, महेंद्र पाटोळे, सुजित भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी सहभाग घेतला.



मागील बातमी
विधी सेवा प्राधिकरणामार्फत माहिती अधिकार कायदा-2005च्या जनजागृतीसाठी कार्यशाळा
पुढील बातमी
कॉपी बहादरांवर राहणार ड्रोनची करडी नजर

संबंधित बातम्या