सातारा : फिनोलेक्स आणि मुकल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान सेरेब्रल पाल्सी संदर्भात गेल्या दहा वर्षापासून सातारा जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे. सातारा जिल्ह्यामधील सर्व मुलांसाठी सातारा, वाई, पाचगणी, खंडाळा, तारळे आणि पाटण या सहा ठिकाणी सेरेब्रल पाल्सी सेंटर मुकल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून चालवले जातात.
या सहा सेंटर मध्ये सेरेबल पाल्सीग्रस्त मुलांसाठी स्पीच आणि फिजिओथेरपी दिली जाते. फक्त या सहा सेंटरमध्ये दिलेल्या स्पीच अँड फिजिओथेरपी वर न थांबता नव्याने ज्या मुलांना गरज आहे त्यांच्यासाठी सेरेबल पाल्सी असेसमेंट कॅम्प घेण्यात येतो.
हा असेसमेंट कॅम्प दि. 31 जानेवारी रोजी सातारा आणि दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी वाई याठिकाणी घेण्यात आला. यामध्ये पुणे येथील नामांकित संचेती हॉस्पिटल भारती हॉस्पिटल, नवले हॉस्पिटल, H V देसाई हॉस्पिटल, तसेच कृष्णा हॉस्पिटल कराड येथील तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
साताऱ्यामध्ये 31 जानेवारीला जे शिबीर झाले त्यामध्ये 161 पेशंटनी त्यांचा सहभाग नोंदवला. वाई येथे झालेल्या कॅम्पमध्ये 105 पेशंटनी त्यांचा सहभाग नोंदवला. ज्या पेशंटला विविध प्रकारची ट्रीटमेंट सांगितलेली आहे, त्यानुसार त्या पेशंटला ट्रीटमेंट मिळण्यासाठी मुकुल माधव येणाऱ्या काळामध्ये त्याचा पाठपुरावा करणार आहे.
वाई येथील शिबिराला जिल्हा परिषदेचा शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम मुजावर यांनी भेट दिली. फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशन चे काम आरोग्य, शिक्षण क्षेत्रामध्ये जे काम गेल्या दहा वर्षापासून सातत्याने करत आहे ते खूप उल्लेखनीय, प्रशांसनीय आहे समाजाच्या सेवेच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या या कामासाठी जे काही सहकार्य जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून लागेल ते आम्ही देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळेस दिली. या कॅम्पच्या आयोजनासाठी समग्र शिक्षा विभागाचे जिल्हा समन्वयक तालुका समन्वयक व विशेष शिक्षक तसेच आरोग्य विभाग, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाकरिता मुकुल माधव फाउंडेशनचे संतोष शेलार, बबलू मोकळे, यास्मिन शेख, अक्षय तसेच समग्र शिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव शेलार, आनंद शेंडगे यांनी विशेष परीश्रम घेतले.