सातारा : राज्य गुणवंत कामगार असोशिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्यावतीने कोल्हापूर येथे माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील ख्यातनाम पत्रकार अमर बाळासाहेब मोकाशी यांना राज्यस्तरीय 'विश्वकर्मा आदर्श पत्रकार' पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना कोल्हापूर येथील छ. शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यात अमर मोकाशी यांना राज्यस्तरीय 'विश्वकर्मा आदर्श पत्रकार' पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार बंटी पाटील, राजयोगिनी ब्रम्हकुमारी सुनंदा दीदीजी, सहायक कामगार आयुक्त विशाल घोडके, निर्मिती विचार मंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने, कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे, राज्य गुणवंत कामगार असोशिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्रचे अध्यक्ष सुरेश केसरकर, कार्याध्यक्ष संजय सासने, उपाध्यक्ष भगवान माने, अनिता काळे, शिवाजी चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्काराबद्दल अमर मोकाशी यांचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, गुणवंत कामगार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव, कार्याध्यक्ष गजानन घाडगे, सैनिक टाकळी येथील उद्योजक शिवाजी बाबर, प्रा. संजय यादव, दीपक ननावरे, सूर्यकांत मोरे, रोहन सालपेकर यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.