सातारा : मावळ तालुक्यातील गौण खनिज प्रकरणाच्या संदर्भात तहसीलदार व मंडल अधिकारी यांना अवैध पद्धतीने निलंबित करण्यात आल्याची घोषणा महसूलमंत्र्यांनी केली .याप्रकरणी जिल्ह्यातील 514 तलाठी व 111 महसूल कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन केले.
त्यामुळे सातारा जिल्ह्यात दिवसभर कोणतीही शासकीय कामकाज होऊ शकले नाही. याबाबतची निवेदन साताऱ्याची अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांना देण्यात आलेले आहे. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पारवे, उपाध्यक्ष सुहास अभंग, पुणे विभाग उपाध्यक्ष प्रशांत पवार, अमोल बोबडे, महिला महसूल अधिकारी जिल्हा तलाठी संघाचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
या निवेदनात नमूद आहे की, महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अन्यायकारक पद्धतीने विधानसभेत तडका फडकी निलंबित केल्याची घोषणा करण्यात आली यामुळे महसुली विभागात फार मोठा क्रॉस निर्माण झाला असून आमचे नीती धैर्य खचले आहे. महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी पासून अपर जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत तीव्र स्वरूपाची नाराजी आहे आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. त्यामुळे महसूल कर्मचारी संघटना दि. 16 व 17 डिसेंबर रोजी सामूहिक रजेवर जाणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी तलाठी सजे महसूल कर्मचारी पुनर्वसन तसेच शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील तब्बल 22 विभाग हे रिकामे होते. महसूल संघटनेने ही निलंबन प्रक्रिया राज्य शासनाने तत्काळ मागे घ्यावी आणि कर्मचाऱ्यांना आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.