ट्रक-टँकर अपघातात एकाचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 07 March 2025


सातारा : ट्रक-टँकर अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हसवे ता.सातारा गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला. ट्रक व टँकर या दोन वाहनाचा हा अपघात झाला आहे. टँकर बंद अवस्थेत उभा होता. टँकर चालकाने कोणतीही खबरदारी न घेता टँकर उभा केला. यावेळी ट्रकची पाठीमागून धडक बसली. यावेळी ट्रकमधील किरण आकाराम सिसाळे (वय 29, रा. नागाव ता.वाळवा जि.सांगली) यांना गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना दाखल केले असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बुधवार पेठेत चैन स्नॅचिंग
पुढील बातमी
मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी करणार्‍या महिलेविरुद्ध भाजप महिला आक्रमक

संबंधित बातम्या