छ. शाहू क्रीडा संकुल परिसरातून दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 22 March 2025


सातारा : छ. शाहू क्रीडा संकुल परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील छ. शाहू क्रीडा संकुलातील दादाज बिर्याणी हाऊस समोरुन दि. 14 रोजी रात्री 8 च्या सुमारास अज्ञाताने दुचाकी (एमएच 11 बी. जे. 2501) चोरुन नेली. या बाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात मिलिंद शंकर लोहार (वय 48, रा. आंबवडे बुद्रुक, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. महिला पोलीस हवालदार माने तपास करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अग्नीशस्त्रासह जिवंत काडतूस बाळगणारा जेरबंद
पुढील बातमी
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या